🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. बाबरने फार कमी वेळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. तो सध्या आयसीसीच्या प्लेअर रँकिंगमध्ये वनडे आणि टी-२०त पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच त्याचे कसोटी क्रमवारीत पाचवे स्थान आहे. ८ जूनपासून पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम म्हणतो की, त्याला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनायचे आहे. पीसीबी मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बाबरने आपल्या नवीन स्वप्नाबद्दल सांगितले. त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असून, ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेत असल्याचे त्यांने सांगितले. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ लवकरच मर्यादित षटकांच्या मालिकेत एकमेकांसमोर भिडणार आहेत.
बाबर म्हणाला, ‘तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन होण्याचे माझे स्वप्न आहे. पण त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार. माझे हे ध्येय साध्य करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे.’ उजव्या हाताचा फलंदाज बाबर सध्या एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर कसोटीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. बाबरने सांगितले की, ‘मुलतान येथे ८ जूनपासून होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेत खेळण्यासाठी तो खूप उत्सुक आहे.’
कोरोना महामारीमुळे क्रिकेटपटू काही काळापासून ऑनलाईन पत्रकार परिषदा घेत आसतात. बाबरने प्रदीर्घ कालावधीनंतर माध्यमांशी संवाद साधला. मीडियासमोर येऊन असे बोलणे माझ्यासाठी खूप छान आहे, असे तो म्हणाला. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १० जूनला तर तिसरा आणि शेवटचा सामना १२ जून रोजी रावळपिंडी येथे खेळवला जाईल.
https://twitter.com/MahamOfficial_2/status/1531650534234640384?s=20&t=m_B9oxuczy7qrbjTe8XSzA
हवामानाबाबत बाबर म्हणाला, ‘ या मालिकेत हवामान (तीव्र सूर्यप्रकाश आणि आर्द्रता) हे निमित्त ठरू नये. अशा हवामानात खेळण्यासाठी राष्ट्रीय संघ जोरदार तयारी करत आहे. हवामान गरम असू शकते, परंतु संघ पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानी कर्णधाराचे म्हणणे आहे की, घरच्या मालिकेत आपले लक्ष वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करण्यावर आहे. पुढे बाबर म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणताही कमकुवत संघ नसतो. कोणताही संघ तुम्हाला हरवू शकतो. जिंकण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. त्यामुळे आम्ही पूर्वीप्रमाणेच सकारात्मक क्रिकेट खेळत राहू.’
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
