मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (28 जून, मंगळवार) आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या सात दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. अशा स्थितीत 22 जून ते 24 जून दरम्यान ठाकरे सरकारने कोट्यवधी रुपयांचे अध्यादेश आणि प्रस्ताव (Government Resolution-GR) काढले. या सर्व पाश्वर्भूमीवर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहे. दरम्यान उदय सामंत यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. “गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे. त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे”, असे उदय सामंत म्हणाले.
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.@samant_uday #MiShivsainik pic.twitter.com/hXgmTMibEB
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
मुख्यमंत्र्यांची बंडखोर आमदारांना कळकळीची विनंती –
शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. आपला नम्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे… अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

