Share

Keshav Upadhyay : “सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण..” केशव उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (28 जून, मंगळवार) आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या सात दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. अशा स्थितीत 22 जून ते 24 जून दरम्यान ठाकरे सरकारने कोट्यवधी रुपयांचे अध्यादेश आणि प्रस्ताव (Government Resolution-GR) काढले.  उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. या वादात भापनेही उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण गेली अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले पण वर्षानुवर्षांची पुण्याईसुध्दा गेली.” अशा आशयाचं ट्विट भाजप नेते केशव उपाध्याय यांनी केलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली जाते. केशव उपाध्याय यांनी देखील ट्विट च्या माध्यमातून यान संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीच सरकार कोसळणार का? सत्ता जाणार का? अशा अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. अशातच केशव उपाध्याय यांनी केलेल्या या ट्विटची बरीच चर्चा सुरू आहे. सोशल मिडियावर हे ट्विट बरेच चर्चेत आहे.

अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले पण वर्षानुवर्षांची पुण्याई गेली अस म्हणत भाजप नेते केशव उपाध्याय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. या ट्विटला शिवसैनिकांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार का? आणि त्यांची सत्ता जाणार का? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!