Share

Maharashtra Political Crisis : “कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो…” ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना कळकळीची विनंती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पोस्ट करत कळकळीची विनंती केली आहे.

उद्धव ठाकरे यांची पोस्ट –

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. आपला नम्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे… अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!