🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांचे चेहरे ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला देखील ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूला देखील ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.आता यामध्येच सुनील शेट्टीने एक मोठं विधान केलं आहे. सध्या हे विधान खूप चर्चेत आहे.
सुनील शेट्टीचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना दिसत आहे. त्याने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त केले आहे आणि चित्रपटसृष्टीला पाठिंबा दिला आहे
https://www.instagram.com/reel/CfVlNrvqejh/?igshid=YmMyMTA2M2Y=
जाणून घ्या काय म्हणाला होता सुनील शेट्टी?
सुनील शेट्टी म्हणाला, “एकाने चुकी केली की सगळे बोलतात बाकीचे देखील चोर आहेत, ड्रग्जची नशा करत आहेत. पण असं काहीच नाही. मी ३० वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. माझे असे ३०० मित्र आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत कोणतंच व्यसन केलेलं नाही. पण बॉलिवूड हे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेलं नाही. कोणाची अशी चूक झाली असेल तर त्याला लहान समजून माफ करा. #boycottbollywood, #bollywooddruggies असं काहीच नाही आहे.” आता सुनील शेट्टीचे हे वक्तव्य आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
