मुंबई : श्रीलंकेने चौथ्या एकदिवसीय सामन्यात (SL vs AUS) ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम खेळताना श्रीलंकेचा संघ ४९ षटकांत २५८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव ५० षटकांत २५४ धावांत आटोपला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. डिकवेला १ आणि पथुम निसांका १३ धावांवर बाद झाले. त्याच्यापाठोपाठ कुसल मेंडिसही १४ धावा करून बाद झाला. कठीण परिस्थितीत संघाची धुरा धनंजय डी सिल्वा आणि असलांका यांनी सांभाळली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दरम्यान, डी सिल्वा ६० धावा करून बाद झाला. असलांकाने शतक झळकावूनही खेळ सुरूच ठेवला. यादरम्यान श्रीलंकेच्या विकेट पडत होत्या. असलांकाने शतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. तो ११० धावा करून बाद झाला. हसरंगा २१ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, मिचेल मार्श आणि कुहनेमन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
Scenes ???? #SLvsAUS pic.twitter.com/KKQqlz49Hz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 21, 2022
प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाने प्रथम फिंचची विकेट गमावली. तो खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर वॉर्नर आणि मिचेल मार्शने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. मार्श २६ धावा करून बाद झाला. लाबुशेन १४ आणि अॅलेक्स कॅरी १९ धावा करून बाद झाले. वॉर्नर अर्धशतक करून एका टोकाला उभा होता. ट्रॅव्हिस हेडने त्याला साथ दिली. २७ धावा करून तो बाद झाला. वॉर्नरने ९९ धावांवर तंबूत परतला. येथून सामना फिरला आणि श्रीलंकेने पुनरागमन केले. अखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे ९ फलंदाज बाद झाले.
शेवटच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. कुहनेमनने शेवटच्या षटकातील ५ चेंडूत १४ धावा केल्या पण शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा डाव २५४ धावांवर आटोपला आणि श्रीलंकेने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वा, करुणारत्ने आणि वेंडरसे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मायदेशात ३० वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा हा पहिला द्विपक्षीय वनडे मालिकाविजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

