🕒 1 min read
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा रंगच बदलला. शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारला आहे. सेनेतील अंतर्गत फुट आज महाविकास आघाडीवर भारी पडताना दिसून येत आहे. आज पहाटे एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले होते. मात्र आता एकनाथ शिंदे मुंबईला दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे आज राज्यपालांना भेटणार असल्याचीही चर्चा राजकारणात होत आहे. त्यामुळे आज दुपारी भाजपसोबत सत्तास्थापनेचा दावा एकनाथ शिंदे करू शकतात, असे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदेंचे एक पाऊल सेनेची धडधड वाढवत आहे. सध्या शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आणखीन 10 आमदार सोबत येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी मोठा दिवस ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार तसेच पुढे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : 40 आमदार माझ्यासोबत, आणखीन 10 आमदार सोबत येणार – एकनाथ शिंदे
- MNS : असली गुहाटीत नकली ‘वर्षा’ वर; ‘मनसे’नी शिवसेनेला डिवचले
- Eknath Shinde : 40 आमदारांसह नवा गट स्थापला! एकनाथ शिंदेंचा ठाकरे सरकारला जबर झटका
- Sanjay Raut : “आमदार नितीन देशमुख सुरत भाजपच्या तावडीत…”, संजय राऊतांचा ट्वीट करत आरोप
- Eknath Shinde : 40 आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीत दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
