Share

Bacchu Kadu : 36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू

Published On: 

गुवाहाटी : गुवाहाटी (Guwahati) विमानतळावर दाखल होताच शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधलाय. तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही मोठा दावा देखील त्यांनी यांनी बोलून दाखवला. तर यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आता मोठा दावा केला आहे.

बच्चू कडू म्हणाले कि, आम्ही विधानपरिषदेला मतदान केलं होतं. मात्र अचानक वातावरण तयार झालं आणि दोन तृतीयांश आमदार फुटल्याने शिवसेनेत आलो. सगळे आमदार स्वखुशीने इथे आले आहेत. 36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले कि, सध्या आम्ही गुवाहाटीमध्ये आहे. आज संध्याकाळपर्यंत समजेल. भाजपचे संजय कुटे आमच्यासोबत आहेत. व्यक्तिगत नाराजी नाही. निधी वाटपात विषमता होती. शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष द्यायची गरज होती. मी मुख्यमंत्र्यांना स्वत:हून फोन केला होता, असंही कडू यावेळी म्हणाले. यानंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत. तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!