मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण (corona positive) झाल्याची माहिती समोर येत आहे. उपचारासाठी ते रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील राजकारणात घडत असलेल्या हालचालीमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचीही मोठी भूमिका येते. महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र त्यापूर्वीच ही मोठी बातमी समोर येत आहे.
एकनाथ शिंदे आज राज्यपालांना भेटणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगत होत्या. त्यामुळे आज दुपारी भाजपसोबत सत्तास्थापनेचा दावा एकनाथ शिंदे करू शकतात, असे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदेंचे एक पाऊल सेनेची धडधड वाढवत आहे. सध्या शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आणखीन 10 आमदार सोबत येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी मोठा दिवस ठरण्याची शक्यता होती. मात्र राज्यपाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता शिंदे राज्यपालांना भेटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आज एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार तसेच पुढे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Bacchu Kadu : 36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू
- Sachin Sawant : सत्तापिपासू, कुटील आणि निर्दयी हे भाजपचे समानार्थी शब्द; ‘काँग्रेस’चा टोला
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे दुपारी राज्यपालांना भेटण्याची शक्यता; राजकीय चर्चांना उधान
- Eknath Shinde : 40 आमदार माझ्यासोबत, आणखीन 10 आमदार सोबत येणार – एकनाथ शिंदे
- MNS : असली गुहाटीत नकली ‘वर्षा’ वर; ‘मनसे’नी शिवसेनेला डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

