मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. “सत्तापिपासू, कुटील, कारस्थानी, अनीती आणि निर्दयी ही सर्व भाजपचे समानार्थी शब्द आहेत. आज महाराष्ट्रात लोकशाही करिता जे विदारक व भयानक चित्र दिसत आहे तेच गेल्या आठ वर्षांत अनेक राज्यांत भाजपने उभे केले आहे. आमदारांवर दबाव, पैसा व यंत्रणांचा वापर हे आता हिडीसपणापर्यंत गेले आहे.”, असा आरोप सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा रंगच बदलला. शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारला आहे. सेनेतील अंतर्गत फुट आज महाविकास आघाडीवर भारी पडताना दिसून येत आहे. आज पहाटे एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले होते. मात्र आता एकनाथ शिंदे मुंबईला दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ते राज्यपालांनाही भेटणार असल्याचे म्हटले जात आहे.
सत्तापिपासू, कुटील, कारस्थानी, अनीती आणि निर्दयी ही सर्व भाजपाचे समानार्थी शब्द आहेत. आज महाराष्ट्रात लोकशाही करिता जे विदारक व भयानक चित्र दिसत आहे तेच गेल्या आठ वर्षांत अनेक राज्यांत भाजपाने उभे केले आहे. आमदारांवर दबाव, पैसा व यंत्रणांचा वापर हे आता हिडीसपणापर्यंत गेले आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 21, 2022
तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उशिरा एक ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच गुजरातचे मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपले ट्वीट अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत गंभीर आरोप केले. “आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh ) हे सुरत येथे भाजप तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली .मुंबईतील गुंड तेथे आहेत गुजरातच्या भूमीवर हिंसा?”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे दुपारी राज्यपालांना भेटण्याची शक्यता; राजकीय चर्चांना उधान
- Eknath Shinde : 40 आमदार माझ्यासोबत, आणखीन 10 आमदार सोबत येणार – एकनाथ शिंदे
- MNS : असली गुहाटीत नकली ‘वर्षा’ वर; ‘मनसे’नी शिवसेनेला डिवचले
- Eknath Shinde : 40 आमदारांसह नवा गट स्थापला! एकनाथ शिंदेंचा ठाकरे सरकारला जबर झटका
- Sanjay Raut : “आमदार नितीन देशमुख सुरत भाजपच्या तावडीत…”, संजय राऊतांचा ट्वीट करत आरोप


