Share

“पवारांच्या खांद्यावर बसून त्यांनी लाचारीने सत्ता…” ; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published On: 

मुंबई: राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राजकीय नेत्यांमध्ये आक्रमक राजकारण पाहायला मिळत आहे. “राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होते. तशी आपली परंपरा होती. पण भाजपमुळे राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली आहे. कोणी कितीही प्रयत्न केले, तरी महाविकास आघाडी भक्कम आहे. त्यामुळे मविआचे चारही उमेदवार निवडून येतील”, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. यांनतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपला जसं गाडलं, आता तीच वेळ महाराष्ट्रात आलीय”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करताना भाजपवर केली होती. या टीकेला अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अतुल भातखळकर म्हणाले, “घरबसली पोपटपंची…. गाडायचं कोणाला हे जनतेचं ठरलं आहे, आणि हो ममता बॅनर्जी कशाही असल्या तरी बहुमत घेऊन सत्तेवर आल्या आहेत. सोनियांच्या चरणी आणि पवारांच्या खांद्यावर बसून त्यांनी लाचारीने सत्ता मिळवलेली नाही”.

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी आणखी एक टीझर जारी –

आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरें यांच्या सभेपूर्वी शिवसेना नेत्यांनी आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. आता शिवसेना नेत्यांनी सभेच्या अगोदर आणखी एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचे भाषण दाखवण्यात आले आहे. सोबतच, “लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर…सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार, भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार, प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार, शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर…” असे टीझरमध्ये म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!