Share

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी भाजपकडून शिवसेनेच्या कारभाराचे धिंडवडे,  टेम्पो भरून लावले बॅनर्स 

Published On: 

औरंगाबाद : उद्धव ठाकरेंच्या सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आता तो दिवस आला आहे. आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे सभेपूर्वीच आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. तसेच आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असे शिवसेनेने म्हंटले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी भाजपकडून शिवसेनेच्या कारभाराचे धिंडवडे उडवायला सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेना नेत्यांनी औरंगाबादमधील वातावरण भगवेमय केले आहे. चौकाचौकात भगवे झेंडे, मोठे बॅनर्स आणि भगव्या रंगाचे पट्टे शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. मात्र आता याच ठिकाणी भाजपकडून शिवसेनेविरोधात बॅनर्स लावले जात आहेत. भाजपकडून शिवसेनेच्या औरंगाबाद महानगरपालिकेतील कारभाराचे धिंडवडे काढणारे बॅनर्स लावायला सुरुवात झाली आहे. ज्या ठीकानी शिवसेनेने भगवे झेंडे, मोठे बॅनर्स लावले आहेत त्याच ठिकाणी भाजपनेही बॅनर्स लावले आहेत.

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये आठ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या पाश्वर्भूमीवर उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “आज औरंगाबादमधील पाणीप्रश्नाचा वर्धापनदिन आहे का?, संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा वर्धापनदिन आहे का?”, असे सवाल भाजपने बॅनर्सच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!