Share

“रैनाने धोनीचा विश्वास गमावला”; विदेशी खेळाडूचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या ‘चिन्ना थाला’ सुरेश रैनाला ऑक्शनमध्ये खरेदी न केल्याने अनेक चर्चाना जोर आला आहे. दशकाहून अधिक काळ चेन्नई साठी खेळलेल्या रैना चेन्नईने अनसोल्ड ठेवल्याने फॅन्ससुद्धा संतापले आहे. सोबतच क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्ग्जानी यासंबंधी चेन्नईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. मात्र आता न्यूझीलँडच्या माजी क्रिकेटर सायमन डलने एक मोठे वक्तव्य केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सायमनने रैना अनसोल्ड राहिल्याबद्दल वक्तव्य केले आहे.तो म्हणाला ” या घटनेचे २ ते ३ भाग आहेत. यूएईमध्ये त्याने आपली चेन्नईप्रति निष्ठा गमावली. ते का होते हे जाणून घेण्याची आपल्याला गरज नाही, परंतु सगळ्यांना त्याबद्दल पुरेसा अंदाज आहे, म्हणून त्याने निष्ठा गमावली आहे. पूर्ण संघातून त्याने एमएस धोनीची निष्ठा गमावली. म्हणून एकदा निष्ठा गमावली की , तुमचे परत स्वागत होण्याची शक्यता फारच कमी असते. तो तंदुरुस्त नाहीये आणि त्याला शॉर्ट बॉलची भीती वाटते.”

सायमनच्या या वक्तव्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे. महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना सुरुवातीपासून सोबत आहे. त्यांनी भारतीय संघातून निवृत्तीही एकाच दिवशी जाहीर केली होती. सुरेश रैना बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. रैना २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये CSK च्या विजेतेपद मिळवलेल्या संघाचा भाग होता. धोनी खेळण्यासाठी अनुपलब्ध असताना त्याने सहा सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!