Share

रात्री 12 शिवछत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन, त्यात ही निर्बंध; मग पत्रकार परिषदेला गर्दी कशी चालते?

Published On: 

औरंगाबाद : क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला; अन्यथा रात्री १० वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजविण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख(District Shiv Jayanti Festival Committee Chairman Abhijit Deshmukh) आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील (Former Chairman Vinod Patil) यांनी केली आहे.

सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांवर बंदी आहे. मग १२ वाजता आम्ही आमच्या राजांचे अनावरण शांततेत कस करणार? तसेच पत्रकार परिषदेला गर्दी होते, ते तुम्हाला चालते, नगरपंचायत किंवा इतर निवडणुकीतील गर्दी, विजयी मिरवणुकीतील गर्दी हे तुम्हाला चालते का? असा सवालही विनोद पाटील यांनी केला आहे.

अनेक वर्षांच्या मागणीनंतर क्रांती चौकातील स्मारक उंच व ऐतिहासिक झाले आहे तर राजांचे स्वागत आम्ही शांततेने कसे करावे, आमच्या माता-भगिनी रात्री १२ वाजता या अनावरण सोहळ्यास येऊ शकतील का? असे कित्येक सवाल विनोद पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच राजकीय कार्यक्रमातील रोड शोला परवानगी पण आम्हाला मशाल रॅली, मोटारसायकल रॅली यास नकार. राजकीय कार्यक्रमात गुन्हे दाखल होत नाहीत आणि शिवजयंतीत गर्दी झाली तर गुन्हे दाखल करण्याची धमकी हे पटत का? असा सवाल करत शिवभक्तांना प्रशासन व सरकारशी कुठलाही वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळे उद्घाटनाची वेळ बदलावी व शिवजयंती वर निर्बंध लादू नये. शिवप्रेमींच्या सहनशक्तीचा अंत बघू नका,आम्ही मोठ्या थाटातच आमचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करणार. असा इशाराही विनोद पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!