Share

“…तरीही अणुयुद्धाची धमकी देणे हा हास्यास्पदच प्रकार म्हणायला हवा”, राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : प्रचंड महागाई, जर्जर झालेली अर्थव्यवस्था यामुळे पाकिस्तानची गोरगरीब जनता नरकयातना भोगत आहे. देश चालविण्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही सरकारला कसरत करावी लागत आहे. या आर्थिक चणचणीमुळे अमेरिका, चीन, अरब राष्ट्रांपासून ते जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यंत सगळीकडेच इम्रान खान मदतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन गेले काही महिने सातत्याने याचना करीत आहेत. पाकिस्तानात सर्वत्र अशी भीषण परिस्थिती असतानाही पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी हिंदुस्थानला अणुयुद्धाची अप्रत्यक्ष धमकी द्यावी, हा पोरकट आणि हास्यास्पदच प्रकार म्हणायला हवा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून इम्रान खान यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘जगभरातील लहान-मोठे सारेच देश विकास आणि प्रगतीच्या वाटेवर घोडदौड करण्यासाठी लक्ष केंद्रित करत असतानाच पाकिस्तान मात्र अजूनही डबक्यातून बाहेर पडायला तयार नाही. दहशतवाद, युद्ध, जिहाद, घुसखोरी, घातपाती कारवाया आणि सतत हिंदुस्थानविरोधी षड्यंत्रे या त्याच त्या गलिच्छ चिखलात पुनः पुन्हा लोळून पाकिस्तानने स्वतःच आपली प्रतिमा ‘युद्धखोर देश’ अशी बनविली आहे. आताही पाकिस्तानने तीच चूक केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कश्मीरच्या मुद्द्यावरून हिंदुस्थान-पाकमध्ये अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एका अर्थाने कश्मीरचा प्रश्न सुटला नाही तर अणुयुद्धाचा भडका उडेल, अशी अप्रत्यक्ष धमकीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने खरे तर जबाबदारीने बोलायला हवे. आपल्या वक्तव्याचे, वर्तनाचे किंवा कृतीचे काय पडसाद उमटतील, जागतिक पातळीवर त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतील, याचा सारासार विचार करूनच कुठल्याही राष्ट्रप्रमुखाने भाष्य करायला हवे, असे संकेत आहेत. मात्र, पाकिस्तानच्या आजवरच्या राज्यकर्त्यांनी जी पोरकट विधाने करून आपले हसे करून घेतले, त्याच बेताल बडबडीची परंपरा इम्रान मियाँनी पुढे चालवली आहे’, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!