मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने टी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यातही विजय मिळवला आहे. भारताने विंडीजला ६ विकेट्सने पराभव केला आहे.
भारताने नाणेफेक प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १५७ धावा केल्या. ज्यात निकोलस पुरनने ६१ धावांची धमाकेदार खेळी केली. तर गोलदांजी मध्ये भारताकडून हर्षल पटेल आणि आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण करण्याऱ्या रवी बिश्नोईंने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. विंडीजच्या १५७ दहावंच पाठलाग करण्यासाठी सलामीला रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले. सलामीला रोहित ४० धावांवर परतला. मात्र मधल्या फळीतील कोहली आणि पंतला २० धावांच्या आत परतावे लागले. भारताला विजयपर्यंत पोहचवण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी ३४ आणि २४ धावांची नाबाद खेळी केली.
https://twitter.com/addicric/status/1493957761150844928?s=20&t=R1cgNC_V9MPfiQVAgc4oXg
भारताने ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. भारताचा दुसरा टी २० सामना १८ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तरीही अणुयुद्धाची धमकी देणे हा हास्यास्पदच प्रकार म्हणायला हवा”, राऊतांचे टीकास्त्र
- मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणे ट्विटरवर भिडले; मेडिकल कॉलेज, सुशांतसिंगचा उल्लेख
- ‘भाजपला दूध दिसत नाही शेण दिसते, त्यांचा दृष्टिकोन तसा आहे’ – नवाब मलिक
- ‘खासदारकी मिळवण्यासाठी ठाकरेंबद्दल चुकीची भाषा वापरली’; नारायण राणेंचा गौप्यस्फोट
- ग्लेन मॅक्सवेल भारतीय पद्धतीने करणार लग्न; पत्रिका व्हायरल


