🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचे वडील बलकौर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना ही धमकी पाकिस्तानी नंबरवरून मिळाली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे कि, “अब तेरा नंबर है बापू”. मानसाचे एसएसपी गौरव तुरा यांनी याला दुजोरा दिला आहे.
वडील बलकौर सिंग यांना पाकिस्तानमधील एका नंबरवरून इंटरनेट मीडियावर धमकीचे संदेश येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मानसा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा मेसेज कोणत्या क्रमांकावरून आला याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची 29 मे रोजी मानसाच्या जवाहरके गावात हत्या करण्यात आली होती. कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रार या गुंडाने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली. यातच आता त्याच्या वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील फरार शूटर मनप्रीत सिंग मनू कुसा आणि जगरूप सिंग रूपा हे काल पोलीस चकमकीत ठार झाले. रूपा याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने रूपाला फरार घोषित केले होते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तो मुख्य शूटर्सपैकी एक होता.
महत्वाच्या बातम्या:
- OBC reservation | ओबीसी आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- Rupali Patil | “तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून…” ; रुपाली पाटलांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात
- IND vs WI : अर्शदीप सिंगला वनडे क्रिकेमध्ये पदार्पणाची संधी; पहिल्या सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची रणनीती
- Sudhir Mungantiwar : सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? काँग्रेसच्या आंदोलनावरून सुधीर मुनगंटीवारांचा सवाल
- Gautam Adani | गौतम अदानी यांनी बिल गेट्सला टाकले मागे; संपत्तीत झाली ‘एवढ्या’ अब्ज डॉलरची वाढ

