Share

Sudhir Mungantiwar : सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? काँग्रेसच्या आंदोलनावरून सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

Published On: 

Sudhir Mungantiwar । मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज सोनिया गांधी या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हज रझाल्या होत्या. याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज देशभरात आंदोलने केली गेली. तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा देशातील प्रत्येक महिलेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता यावर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ सोनिया गांधी काय संविधानापेक्षा मोठ्या आहेत? इटाली या देशात त्यांचा जन्म झाल्यामुळे या देशातील 138 कोटी जनतेपेक्षा वरचा दर्जा त्यांना आहे का ?, त्यांना मा. मोदीजींची 9-9तास सीबीआय मार्फत चौकशी केली. एकही कार्यकर्ता आंदोलनाला गेला नाही. आम्ही हीच भूमिका घेतली. चौकशी करायची असेल तर आम्ही मदत केली. 9 तास मोदींजींनी सहाकर्य केलं. चौकशीला बोलावलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुन्हेगार आहात. नॅशनल हेरॉल्ड या केसमध्ये काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले, असं ते म्हणाले.

दरम्यान, आज देशभरात काँग्रेस आक्रमक झाली असून सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर! सोनियाजींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही, असे ठणकावून सांगत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा काँग्रेसच्यावतीने अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!