🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क, एलव्हीएमएचचे मुख्य कार्यकारी बर्नार्ड अर्नाल्ट आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या नंतर ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती गुरुवारी 115.6 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे 90 अब्ज डॉलर्ससह या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. तर टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क $ 235.8 अब्ज संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानावर आहेत. या यादीतील लॅरी एलिसन, वॉरेन बफेट, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा देखील समावेश आहे.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे कमोडिटीज, सी-पोर्ट्स, अन्न आणि हरित ऊर्जा या क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान पटकावला. गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे शेअर्स 600 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात केलेल्या कामामुळे सरकारी योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. अवघ्या तीन वर्षात अदानी समूहाने सात विमानतळांसह भारतातील जवळपास एक चतुर्थांश हवाई वाहतूक आपल्या ताब्यात घेतली आहे, असे ब्लूमबर्गने एका अहवालात म्हटले आहे. त्यांचा समूह आता देशातील सर्वात मोठा विमानतळ ऑपरेटर, पॉवर प्लांट आणि सिटी गॅस रिटेलरचा मालक आहे.
5G लिलावात सहभागी
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह अदानी डेटा नेटवर्क्सनेही आगामी 5G लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता अदानी समूहही स्पेक्ट्रमच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Vijay Wadettiwar : श्रेयवादापेक्षा OBC आरक्षण मिळाले याचा आम्हाला आनंद – विजय वडेट्टीवार
- Devendra Fadnavis : “सगळा अभ्यास आदित्य ठाकरेंनीच केलाय असे नाही”; मेट्रो कारशेड प्रकरणावरून फडणवीसांचा टोला
- Ganeshotsav 2022 | गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने शिंदे सरकारने उठवली
- Eknath shinde : गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Urfi Javed | प्रत्येक मुलीला कुणीतरी म्हणतच की माझ्यासोबत झोपावं लागेल- उर्फी जावेद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
