Share

IND vs WI : अर्शदीप सिंगला वनडे क्रिकेमध्ये पदार्पणाची संधी; पहिल्या सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची रणनीती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताच्या युवा क्रिकेटपटूंची कसोटी लागणार आहे. ही मालिका अशा वेळी होत आहे जेव्हा द्विपक्षीय एकदिवसीय सामने आयोजित करण्याची चर्चा जोरात सुरू आहे. बेन स्टोक्सच्या अचानक निवृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विशेषत: द्विपक्षीय मालिकेतील व्यस्त वेळापत्रकाच्या चर्चेला उधाण आले होते. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये नियमितपणे खेळणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत कसोटी आणि टी-२० मध्ये अडकलेल्या वनडे क्रिकेटमध्ये स्थान मिळवणे कठीण होत आहे. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिल्या सामन्यात संधी मिळू शकते. या मैदानावर टीम इंडियाने २०११ पासून एकही सामना हरलेली नाही.

वेस्ट इंडिज संघ फेब्रुवारीमध्ये भारतात ५ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळण्यासाठी आला होता. या दोन संघांमध्ये पुन्हा मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाणार आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत वनडेचे महत्त्व थोडे कमी झाले असल्याचे दिसत आहे. मात्र या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्याने शिखर धवनकडे एकदिवसीय संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिखर धवन त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा भारताचे नेतृत्व करणार आहे.

वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. एखाद्या खेळाडूसाठी सातत्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळणे शक्य नसते. त्यामुळे संघातील काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार पदाची जबाबदारी शिखर धवन कडे देण्यात आली आहे. मात्र त्याच्यासोबत सलामीला फलंदाजी कोण करणार हा प्रश्न आहे. युवा खेळाडूंमध्ये शुबमन गिल किंवा ऋतुराज गायकवाड यांना धवन सोबत सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच संघातील अनुभवी गोलंदाजांच्या गैरहजेरीत युवा गोलंदाज अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याने वारंवार आपल्या दमदार कामगिरीने स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे.

मधल्या फळीतील फलंदाजांच्या क्रमवारीतही गोंधळ

पहिल्या सामन्यात भारतासाठी मधल्या फळीत कोणता फलंदाज कुठल्या क्रमांकावर खेळणार यावरही सध्या प्रश्नचिन्ह आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांची नावे समोर येतात. मात्र या खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत संघ व्यवस्थापनाला निर्णय घेणे कठीण जाणार आहे. अशातच तिसऱ्या क्रमांकावर दीपक हुडा आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव तर पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसंग किंवा श्रेयस अय्यर यांना खेळवले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!