मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. जेव्हापासून मालिकांना कोठडी जाहीर झाली तेव्हा पासून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचे वादळ आले आहे. भाजपाकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर महाविकास आघाडी मलिकांचा राजीनामा घेणार नाही असे सांगत आहे. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारच दाऊदचा माणूस असू शकतात असं विधान ट्विटद्वारे केले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील अशा प्रकारची विधानं केल्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “मी केलेल्या वक्तव्यावरून माझ्या विरोधात आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर महाविकासआघाडी आणि पवार यांचे दाऊद इब्राहिमवर इतकच प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.” असा आरोप राणेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
