Share

“गहू आणि तांदूळ अनुदानावर द्या”, पोल्ट्री उद्योजकांची केंद्र सरकारकडे मागणी!

Published On: 

पुणे : पक्षांच्या खाद्य दरात वाढ झाल्यामुळे पोल्ट्री धारकांकडून शेतीमालाच्या दरात घट करण्याची मागणी होत आहे. सोयापेंडवरील आयातशुल्क कमी करावे तसेच सोयाबीनचे दर अटोक्यात रहावे म्हणून याआधी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेपच केला नसल्याने सोयाबीन दर कमी झाला नाही. खर्च वाढल्याने पोल्ट्री व्यवसाय बंद पडतील, अशी चिंता पोल्ट्री धारकांनी मांडली आहे.

आता पुन्हा पक्षांच्या खाद्यदरात वाढ होत असताना गहू आणि तांदूळ हे अनुदानावर देण्याची मागणी पोल्ट्री उद्योजकांनी केली आहे. पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना खाद्यासाठी मका आणि सोयामीलचा अधिकचा वापर होतो. महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पोल्ट्री खाद्याचे दर हे गेल्या तीन महिन्यांमध्ये 35 वरुन 45 रुपये प्रतिकिलोवर आलेले आहेत.

..अन्यथा व्यवसाय बंद करण्याचे प्रमाण वाढणार –

वाढत्या पशखाद्याच्या दरामुळे पोल्ट्री व्यवसायही बंद करण्याची नामुष्की ओढावलेली आहे, असे दिसत आहे. त्यामुळे सरकारनेन जर गहू आणि तांदळावर अनुदान दिले तर व्यवसाय उभारी घेऊ शकेल अन्यथा वाढत्या महागाईला त्रासून हा व्यवसाय बंद करण्याचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी पुन्हा वाढत्या मागणीमुळे चिकन, अंड्याचे दर वाढतील असा अंदाज पोल्ट्री उद्योजक विजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!