🕒 1 min read
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शनिवारी आपल्या संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसी याची कर्णधार पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे तो या हंगामात संघाचे नेतृत्व करेल.
यातच फाफचा जवळचा मित्र आणि आरसीबी संघाचा माजी खेळाडू एबी डीविलियर्स याने एक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, फ्रेंचाइजीने आयपीएल २०२२ हंगामासाठी फाफला कर्णधार म्हणून निवडून योग्य निर्णय घेतला आहे.
डीविलियर्स म्हणाला की, “आरसीबीने त्याला या वर्षी खरेदी केले. त्यावेळेसच मला वाटले होते की, त्याला कर्णधार बनवले जाईल. एबी म्हणाला मला विश्वास आहे की, तो संघाला खूप वर घेऊन जाईल. आपला नवीन कर्णधार आणि माझा चांगला मित्र फाफला कर्णधार म्हणून निवडल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. तो एक चांगला लीडर आहे. आणि तो पूर्ण जिम्मेदारी घेऊन काम करेल. त्याचे डोके खूप चांगले आहे. आणि त्याला संघातील सगळ्यांचे समर्थन भेटेल. शेवटी तो म्हणाला, शुभेच्चा माझ्या मित्रा,”
विराट कोहलीने मागील हंगामानंतर संघाचे कर्णधार सोडले होते. ज्यानंतर संघाला नवीन कर्णधाराची गरज होती. कोहलीने ९ वर्षे आरसीबीचे नेतृत्व केले आहे. परंतु आता संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसी करणार आहे. त्याला आयपीएल २०२२ मेगा लिलावात ७ कोटी देऊन आरसीबीने आपल्या संघात सामील केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
