Share

“विराट कोहलीनं वयाच्या ४५व्या…” शोएब अख्तरनं दिला जबरदस्त सल्ला; काय म्हणाला? वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहली मागील काही महिन्यांपासून त्याच्या खराब फॉर्ममुळे सतत चर्चेत आहे. एवढेच नाही तर त्याच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीने आगीत आणखीच तेल टाकण्याचं काम केलं. खराब कामगिरीमुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. आयपीएलच्या १५ व्या मोसमात कोहलीने १६ सामन्यात २२.७३ च्या सरासरीने आणि ११५.९९ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा केल्या. यंदाच्या आयपीएल मोसमात त्याला फक्त दोनच अर्धशतके करता आली. तसेच मोसमात तो तीनदा गोल्डन डकवरही बाद झाला. कोहलीची आयपीएल कारकिर्दीतील ही दुसरी सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. २०१९ सालापासून त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

विराट कोहलीच्या खराब फलंदाजीवर टीका झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या समर्थनार्थ उतरला आहे. लोकांनी विराट कोहलीचा आदर केला पाहिजे, असे शोएब अख्तरचे मत आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीने ११० शतके झळकावीत अशी माझी इच्छा असल्याचे त्याने सांगितले. शोएब म्हणाला की, “कोहलीवर बोलण्यापूर्वी लहान मुले त्याच्याकडे आदर्श म्हणुन पाहतात हे समजून घेतले पाहिजे. कोहलीबद्दल मुलांना छान गोष्टी सांगा आणि त्याला योग्य तो आदर द्या. एक पाकिस्तानी म्हणून मी म्हणतो की तो सर्वकाळचा महान खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११० शतके झळकावीत आणि वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत खेळावे अशी माझी इच्छा आहे.

तो पुढे म्हणाला की, “ही कठीण परिस्थिती विराट कोहलीला ११० शतकांसाठी तयार करत आहे. लोक तुमच्या विरोधात लिहित आहेत, ट्विट करत आहेत. दिवाळीबद्दल ट्विट केले तर त्यावरही टीका होते. लोक तुमच्या पत्नी आणि मुलाबद्दल ट्विट करतात. जेव्हा तुम्ही विश्वचषक गमावता तेव्हा तुमच्यावर खूप टीका होते. यापेक्षा परिस्थिती आणखी वाईट होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःचा खेळ पुन्हा परत मिळव आणि लोकांना दाखव कोहली कोण आह.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!