मुंबई : सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. ‘यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे, महागाईपासून दिलासा मिळू दे, शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू दे’, असं साकडं त्यांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी घातलं. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी, “महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास सगळ्या आमदारांसह दर्शनाला येईन, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे’, असं साकडं देखील त्यांनी देवीच्या चरणी घातलं आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘पुढील २५ वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील,’ असा दावा केला होता. आता यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक खोचक टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टचं शीर्षक आहे. पुरोगाम्यांचे नवस अन भविष्य. यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्या हातात घड्याळ बांधणार का असा खोचक वार उपाध्ये यांनी केला आहे. तुम्ही कितीही दावे केले तरी, पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असेही त्यांनी फेसबूक पोस्टमधून म्हंटले आहे.
https://www.facebook.com/keshavupadhye/posts/pfbid0GQWg6vxCtkFxoo2SMTjxERNhh2aA49cmUzSRaePszHSD6SAkedZz2DiDc8s5DkYrl
केशव उपाध्ये म्हणतात, “पुरोगाम्यांचे नवस अन भविष्य. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास सगळ्या आमदारांसह दर्शनाला येईन, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेला केलेल्या नवसाची कालपासून चर्चा आहे. खरंतर कट्टर पुरोगामी मंडळी मंदिरांचे उंबरठे झिजवून देवांना नवससायास करू लागतीत, हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. बाकी आता देवीच्या आशीर्वादानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, या शिवसेना प्रवक्ते, प्रख्यात ज्योतिषी सामनावीर संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचं काय होणार? की हा दावा खरा ठरण्यासाठी आणि सुप्रियाताईंचा नवसही पूर्ण व्हावा यासाठी मध्यममार्ग म्हणून उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधणार? म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले म्हणून राऊत समाधानी आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, म्हणून सुप्रियाताईही समाधानी. बाकी तुम्ही कितीही दावे तरी पुढचा मुख्यमंत्री हा कुठल्याही फोडाफोडी, तिघाड्यांमधून नाही तर जनतेच्या स्पष्ट बहुमताच्या बळावर निवडून येईल आणि तो मुख्यमंत्री भाजपाचाच असेल.
महत्त्वाच्या बातम्या :


