यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील वाकद येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात टरबुजाची लागवड केली आहे. उन्हाळ्यामध्ये टरबुजाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि शेतकरी याच विचाराने टरबूजाला चांगला भाव मिळेल म्हणून मोठ्या प्रमाणात टरबूजाची लागवड करत असत. वाकद येथील शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळतील या दृष्टीने टरबूज शेती केली होती.
शेतकऱ्यांचे टरबूजाचे पिक विक्री करण्याआधीच टरबुजाचे भाव कमी झाले आहेत. यामुळे वाकद येथील शेतकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. टरबुजाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. योग्य भाव मिळत नसल्यामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल आता सडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांची मागणी –
महागाव तालुक्यातील वाकद येथील शेतकी मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी शेतामध्ये आक्रोश व्यक्त करत आहेत. राज्य सरकारने आमच्या पिकाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

