Share

‘पिक कर्ज योजने’बाबत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा; शेतकऱ्यांना होणार लाभ!

Published On: 

मुंबई :  शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतत वेगवेगळ्या योजना राबवत असते. आता शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून पीक कर्ज योजना अधिक प्रभावीपणे आमलात आणण्याची तयारी  करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली ही ‘पिक कर्ज योजना’ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. कारण रब्बी आणि खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. हीच गरज लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

यावर्षी शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या उद्दिष्टापासून काही बँका खूप दूर आहेत. पीक कर्ज योजनेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिक कर्जाची वाटप वेळेत करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन बँक मेळावे आयोजित करावे, शेतकऱ्यांना कर्ज मिळाले तरच या योजनांची उद्दिष्ट्ये पूर्ण होतील”.

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे म्हणून यंदा राज्य सरकारने धोरणात बदल केले आहेत. एप्रिल महिन्यापासून कर्ज वाटप प्रक्रिया सुरु करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पण खरीप हंगाम तोंडावर आला असता बँका अजून देखील उद्दिष्टापासून लांब आहेत. त्यामुळे आता वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कर्जाची वाटप होणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!