Share

IPL 2022 : आमिर खानने गुजरातच्या ‘या’ खेळाडूला घरी येण्याचे दिले आमंत्रण; स्वयंपाक बनवून खाऊ घालण्याचा केला आग्रह

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यामध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान कॉमेंट्री करताना दिसला. यादरम्यान त्याने अंतिम सामना सुरू होण्याअगोदर गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहल तसेच गुजरातचा फिरकीपटू राशिद खानचीही मुलाखत घेतली. आमिरचे क्रिकेटवरील प्रेम कोणापासूनही लपलेले नाही आणि तो अनेकदा सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसला आहे. अंतिम सामने अगोदर आमिर खानने राशिद खानशी संवाद साधताना त्याच्या कुकिंग स्किल्सचीही प्रशंसा केली होती.

राशिद खान आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत होता. तो अनेक वेळा संघातील खेळाडूंना देखील स्वयंपाक बनवून देताना दिसला आहे. रशीदची स्वयंपाकाची कला चांगल्या प्रकारे अवगत आहे. आमिर खानने बोलताना त्याला म्हणतो की, ‘मी ऐकले आहे की तू तुझ्या सहकारी खेळाडूंनाही जेवणं बनवून खायला दिले आहेस. मग तुझ्या हाताने बनवलेल्या जेवणाची चव मला कधी मिळणार.’ यावर उत्तर देताना राशिद खान म्हणाला की, ‘आमिर सर तुमच्यासाठी स्वयंपाक बनवायला खूप आनंद होईल.’ यावर उत्तर देताना आमिर म्हणाला की, पुढच्या वेळी तू मुंबईत असताना माझ्या घरी येऊ शकतोस, पण तुला स्वयंपाक करून मला खायला द्यावा लागेल.

या मुलाखतीदरम्यान आमिर खानन राशिदला म्हणाला की, तू गोलंदाज आहेस पण आयपीएल २०२२ मध्ये मी तुला चांगली फलंदाजी करतानाही पाहिले आहे. प्रत्युत्तरात राशिद खान म्हणाला की, आता मी संघ व्यवस्थापनाला विनंती करेन की खेळाडूंच्या यादीत मला केवळ गोलंदाजच नव्हे तर अष्टपैलू खेळाडूचा दर्जा द्यावा. रशीद खानला आयपीएल २०२२ मध्ये गुजरात संघाने खरेदी केले होते. याआधी तो पाच वर्षे सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. गुजरातने जेतेपद पटकावल्यानंतर राशिद खानने ही आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!