Share

IND vs SA : भारताचा ‘हा’ युवा गोलंदाज ठरू शकतो आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी; वाचा!

Published On: 

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होतेय. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही ५ सामन्यांची मालिका ९ ते १९ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने या मालिकेसाठी एका युवा वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संधी देण्यात आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. हा गोलंदाज मधल्या षटकांमध्ये भेदक आणि यॉर्कर टाकण्यात तरबेज आहे. आयपीएलच्या १५ व्या मोसमात या गोलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच त्याची आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली.

निवड समितीने अर्शदीप सिंहवर विश्वास दाखवत संधी दिली आहे. अर्शदीपने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १३ सामन्यात १० बळी मिळवले आहेत. मात्र अर्शदीपमध्ये ‘वाइड यॉर्कर’ आणि ‘ब्लॉक-होल’मध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता अफाट आहे. त्यामुळे आता आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.

भारतीय संघ : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!