टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. या यात्रेनिमित्त बुलडाणा येथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना हा निवडणुकीपुरता पक्ष नाही तर २४ तास जनतेची सेवा करणारा पक्ष आहे असं विधान केले आहे.
या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोठ विधान केले. त्यांनी ‘जातीपातीचे भेद बाजूला ठेवून नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. ही राजकीय यात्रा किंवा मतदानासाठी यात्रा नाही, तर सर्वांना आठवण करून देणारी आहे की शिवसेना हा काही निवडणुकीपुरता पक्ष नाही तर चोवीस तास जनतेची सेवा करणारा पक्ष आहे’ असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलताना ‘जनतेचे अनेक प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, रखडलेले प्रकल्प असतील ते सर्व प्रश्न घेऊन शिवसेना लढत असते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरघोस यश मिळवून दिले आहे. त्या सर्व जनतेचे आभार मानायला मी तुमच्यापर्यंत आलो आहे. जनतेने मला आपले आशीर्वाद द्यावेत, शिवसेनेने दिलेले प्रत्येक वचन आम्ही पूर्ण करणार आहोत असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेनी जनआशीर्वाद यात्रा, भाजपकडून महाजनादेश यात्रा, राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा तर कॉंग्रेसकडून पोलखोल यात्रा आयोजित केलेली आहे. या पद्धतीने राजकीय पक्ष विधानसभेची तयारी करत आहेत.
- नातेवाईकांच्या प्रश्नावरून शरद पवार संतापले, पत्रकाराला निघून जाण्याची केली विनंती
- मराठा क्रांती ठोक मोर्च्याची निवडणुकीच्या रिंगणातून माघार, युतीला देणार पाठींबा
- परभणीची महाजनादेश यात्रा झाली सफल, नगराध्यक्षासह १७ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
- मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

