🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा साधला. त्या लोकांना झोप लागत नाहीय. खोकी मिळाली म्हणून झोप लागतेच असं नाही. अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अनेक आमदारांनी तर या बंडाचे मुख्य कारण हे संजय राऊत यांनाच मानले आहे. बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचाही जोरदार विरोध केला आहे.
संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी बोलताना बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. संपूर्ण जनतेला माहिती शिवसेनेतून गेलेल्या आमदाराला परत ते निवडून आणत नाहीत त्यामुळे तुम्ही आता तुमच्या मतदारसंघातून निवडून येऊनच दाखवा हा शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही. कारण शिवसेनेतून बाहेर गेल्यांचा निवडून येण्याचा इतिहासच आहे. ते तिकडे गेलेत म्हणजे त्यांना स्वस्त नाही त्यांना झोप लागत नाही कारण खोकी मिळाल्याने झोप लागतेच असं नाही. या सगळ्यांना शिवसैनिकांचे हाय लागणार. बाळासाहेबांचा आत्मा हे सर्व पाहत आहे. त्यामुळे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावल्याने कोणी बाळासाहेबांचे वारसदार होऊ शकत नाही. अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली.
भाजपचा शिवसेनेला हरवण्याचा नाही तर शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. त्यांना शिवसेना संपवता आली नाही म्हणून आमदारांना पैशांचे खोके देऊन शिवसेना फोडण्याचे काम केले. केंद्रातील तपास यंत्रणांचा आमदारांना धाक दाखवण्यात आला. त्यामुळे शेवटी शिवसेना फुटली पण आमदार फुटले आहेत शिवसेना फुटलेली नाही. आता या चाळीस आमदारांनी फक्त निवडणुकीत निवडून दाखवावं. असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला.
शिवसेनेतील काही लोक फुटली. त्यांनी त्यांचा मानसन्मान विकला आहे. शिवसेनेत येण्या अगोदर काय होते यांच्याकडे. शिवसेनेच्या नावामुळेच हे निवडून आले. हजारो शिवसैनिक कार्यकर्त्यांनी यांची काम केले नसते तर यांची नगरपंचायतीतही निवडून येण्याची लायकी नाही. ज्यांना शिवसेनेने मानसन्मान दिला मंत्रीपद दिली त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात राज्यासाठी एवढे चांगले काम केले आणि तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री भेटत नव्हते. मुख्यमंत्री कामे करत नव्हते. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेत पळ काढला आणि शिवसेनेसोबत दगाबाजी केली. असेही यावेळी राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
