Share

Deepali Syyed | “शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती” ; दिपाली सय्यद यांचे ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात अनेक मोठ्या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेत मोठा बंड केला. या बंडांनतर शिवसेनेतीन अनेत नेत्यांना मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyed) उद्धव ठाकरे आणि एकानाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काल देखील त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांनी ट्विट केले आहे.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “आदरणीय उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून शिंदे साहेबांच्यावतीने प्रवक्ते व आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपने मोठ्या मनाने मध्यस्थी करावी.”

काल (शुक्रवार) देखील दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. “शिवसेना तोडून लढण्यापेक्षा जोडून लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे”, असे ट्विट दिपाली सय्यद यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!