मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कायम त्यांच्या टीका करण्याच्या शैलीमुळे चर्चेत असतात. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर संजय राऊत मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले होते. एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांनी बंडखोरी करण्यामागचे खापर संजय राऊत यांच्या माथ्यावर फोडले. राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मिळून सरकार स्थापन केले. यानंतरही संजय राऊत यांचा विरोधकांवर हल्लाबोल सुरूच आहे. ते त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून वारंवार विरोधकांवर खोचक टीका करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पलटवार केला आहे. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे, अशा शब्दात राऊतांनी फडणवीस यांना सुनावले आहे.
माणूस किती लाजिरवाण्या पद्धतीने खोटे बोलू शकतो. एखाद्या असत्य गोष्टीला सत्यात उतरवून किती चांगल्या प्रकारे रंगवून सांगितले तरी सत्य कधी लपत नाही. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर आणि हवेत उडणाऱ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केल्याचे दिसत आहे.
फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विधानसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी करणार असल्याचे ठरले होते. त्यावेळी मी शिवसेनेची चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मला तेव्हा मिळाला नाही, असा दावा त्यांनी केला होता. यानंतर संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत त्यांच्या ट्विटर अकाउंट वर एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.
फडणवीस यांनी संजय राऊत यांना लाऊडस्पीकर म्हटले होते. यावेळी रावतांनी फडणवीसांच्या या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. ‘आमचा लाऊड स्पीकर हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी वाजतो. आम्ही भाड्याचे भोंगे वापरत नाही. त्यामुळे भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यामध्ये फरक आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.
Ohhh… loud speaker!
ठीक ढंग से बोले गए
झूठ को ही आज कल
सत्य कहते है…
जय महाराष्ट्र!@AUThackeray@BJP4Maharashtra pic.twitter.com/NGLRSwBro8— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
“आम्ही भाजप सारख्या पिपाण्या वाजवणार नाहीत. हे सरकार कधी पडणार याच्याही तारखा देणार नाहीत. त्यांना जे काही पिपाण्या, सनई, चौघडे वाजवायचेत ते वाजू द्यात. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. अंतर्गत कलहाने हे सरकार लवकरच कोसळेल असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. दोघेच जण मिळवून सरकार चालवत आहेत. सध्या राज्यात हम दोनो एक दुजे के लिये असच चाललंय, असा टोलाही संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ ; मनसे नेत्याचं सूचक ट्विट
- Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक
- Mahesh tapase | तुम्ही नगरविकास मंत्री होता, तेव्हा मुंबई शहर खड्डे मुक्त का नाही केले? – महेश तपासे
- Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र नवीन हातात जाणार?; रोहित पवारांचे सूचक विधान
- Eknath Shinde । अक्कलकोट बस अपघातातील जखमींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉल वरून केली विचारपूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

