🕒 1 min read
मुंबई : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते भय्या चौक बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवक चे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला. या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी शिंदे गट , अमुक तट म्हणू नका म्हणत ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ शिंदे भाऊंची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं.
आरोग्य मंत्री सावंत यांचे शिंदे गटाकडून सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले मात्र शिंदे गट , अमुक तट म्हणू नका म्हणत ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे.ज्यांनी हिंदुतत्वाचे व्रत , विचार तुम्हा आम्हाला दिशा दिली. मार्गदर्शन केले. तो विचार कुणी तरी सोडला होता. तो विचार घेऊन आज आम्ही तुम्हा समोर येतोय. भविष्यात देखील तीच विचारधारा घेऊन आम्ही जनतेची सेवा करू असेही तानाजी सावंत यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | राज ठाकरे ‘वर्षा’वर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चांना पुन्हा उधाण
- Navneet Rana | ही तर फक्त सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है – नवनीत राणा
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे घेणार राज्यापालांची भेट, नवीन 12 आमदारांची यादी तयार
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं मिशन विदर्भ देणार उद्धव ठाकरेंना टक्कर?
- Chandrashekhar Bawankule | धोकेबाजांना पळास्ता करायचे आहे – चंद्रशेखर बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
