Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे घेणार राज्यापालांची भेट, नवीन 12 आमदारांची यादी तयार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यामधील वाद आता आणखीन चिघळणार असल्याचं दिसून येत आहे. विधानसभेसाठी ठाकरे सरकारकडून पाठवण्यात आलेल्या 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आली होती. ही यादी शिंदे यांच्या मागणी मुळे राज्यपालांकडून रद्द करण्यात आली होती. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन 12 आमदारांची यादी तयार केली असून आज राज्यपाल यांना भेटण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे.

एकनाथ शिंदे घेणार राज्यपालांची भेटः

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपाल कौश्यारी यांना भेटणार असून बारा आमदारांची यादी ते राज्यपालांना देणार आहेत. यापूर्वी सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी 12 आमदारांची यादी राज्यपालांना दिली होती. मात्र राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आधीची यादी रद्द झाल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारने नवीन 12 सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकारकडून आता 12 आमदारांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी यादी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलं आहे. शिंदे गटाला आणि भाजपला कितीचा कोटा मिळणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!