🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शाह यांनी पक्षाच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासह उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आदेश कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर “आम्ही 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी लढत आहोत” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योजना आखणार असून मुंबईची जनता यावेळी आम्हाला बहुमत देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ज्यांची 35वर्ष सत्ता असूनही मुंबईचा विकास झाला नाही, तसेच भ्रष्टाचारमुक्त मुंबई झाली पाहिजे हे स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेच्या धोकेबाज या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्राला माहित आहे धोकेबाज कोण आहे, 2014 आणि 2019 ला कोणी धोका केला हे जनतेला माहिती आहे, धोकेबाजांना पळवायचे आहे, असे सांगत जनताच खऱ्या धोकेबाजांना धडा शिकवेल असा दावाही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | “तु ठाकरे है, तो मै भी राणा हूं…”, नवनीत राणा एकरी भाषा वापरत उद्धव ठाकरेंवर बरसल्या
- Tanaji Sawant | आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी धरला लेझीमवर ठेका
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर
- Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन बी! ‘या’ ठिकाणावर नजर
- Shivsena । महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येतोय; शिवसेनेचा शिंदे गटावर प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
