🕒 1 min read
मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मी एक महिला आहे त्याशिवाय 25 लाख लोकांमधून निवडून आलेली खासदारही आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही, तर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. असं असताना उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अजून तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे.
देशात सध्या गाजत असलेल्या लव जिहादचा आपण लवकरच खात्मा करणार असून आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. ही तर सुरुवात आहे, पिक्चर तो पुरी बाकी है’ असं म्हणून खासदार राणा यांनी ठाकरे यांना इशारा दिला आहे. जळगाव शहरातील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्यावतीने गणरायाची आरती आणि हनुमान चालीसा पठणासाठी राणा दाम्पत्य जळगावात दाखल झाले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं मिशन विदर्भ देणार उद्धव ठाकरेंना टक्कर?
- Chandrashekhar Bawankule | धोकेबाजांना पळास्ता करायचे आहे – चंद्रशेखर बावनकुळे
- Navneet Rana | “तु ठाकरे है, तो मै भी राणा हूं…”, नवनीत राणा एकरी भाषा वापरत उद्धव ठाकरेंवर बरसल्या
- Tanaji Sawant | आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी धरला लेझीमवर ठेका
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
