Share

विधानसभेची मोर्चेबांधणी : शिवसेना-भाजपमध्ये होणार जागांची अदलाबदल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- आगामी विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच युती करून लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, तसंच काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत एका छोटेखानी समारंभात या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. काही भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात, अशी जागांची अदलाबदल करण्याचा निर्णयही १५ दिवसांत घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये येण्यास कोणताही दबाव टाकला जात नाही. भाजपाच्या चांगल्या कार्यपद्धतीला पाहून सर्व नेते आमच्या गोटात दाखल होत आहे. आता बहुमताचे सर्व विक्रम मोडीत काढणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बहुमत गमावलं …तरीही कुमारस्वामी राहणार मुख्यमंत्री

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती फक्त एका क्लिकवर

आम्ही सोबतच, १५ दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय घेणार : देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!