Share

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे.

कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. वाऱ्याची दिशा फिरेल तशी विरोधी पक्षाचे आमदार टोपी फिरवू लागले आहे.राज्यातल्या दोन्ही काँग्रेसमधलं पक्षांतर बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होण्याची गरज असल्याचं मत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

भाजपला खऱ्या अर्थानं निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यांनी मतदान यंत्राचा वापर करण्याऐवजी मत पत्रिकांचा वापर करून निवडणुका लढवून दाखवाव्यात असं आव्हानही जगताप यांनी यावेळी बोलतांना दिलं.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर बुधवारी हे चारही जण भाजपवासी झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजीमहिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. फक्त ४ नाही तब्बल ४० आमदार आमच्या संपर्कात आहे असं विश्वास गिरीश महाजन यांनी देखील व्यक्त केला आहे. यामुळे भाजप-सेना बळकट होताना दिसत आहे, मात्र आघाडी खिळखिळीत होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

तब्बल अकरा वेळा विजयी झालेल्या ‘या’ आमदाराची यंदाच्या निवडणुकीतून माघार

राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराने घेतली चंद्रकांत पाटलांची भेट; राजकीय चर्चांना उधान

राष्ट्रवादीच्या विदर्भातील एकमेव आमदाराला पक्षात घेण्यासाठी युतीत चडाओढ

शिवेंद्रराजे, संग्राम जगताप पक्ष सोडणार नाहीत : शरद पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!