टीम महाराष्ट्र देशा- कोयना आणि वारणा धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि मोरणा नद्यांचे पाणी अनेक ठिकाणी पात्राबाहेर पडले आहे. अनेक पूल, बंधारे आणि नदीकाठची पिकं पाण्याखाली गेली आहेत.
सांगली शहरालगत कृष्णानदीचे पाणी नागरी वसाहतीत घुसले आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम लष्करीपातळीवर सुरू आहे. आज सकाळपर्यंत कृष्णेची पाणी पातळी ३५ फुटापर्यंत पोहोचली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावर असलेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान आज सकाळी वारणा धरणाचे चारही दरवाजे उघडले जाणार असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवले आहे.

मराठवाड्यात बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. औरंगाबाद परिसरात आज सकाळपासून भीज पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात सूर्यदर्शनही झालेलं नाही.
उस्मानाबाद, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे.
पुणे शहरात मागील आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
या चार धरणांपैकी खडकवासला धरण १०० टक्के भरले असून या धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे झेड ब्रीज खालील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हे दृश्य पाहण्यास पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘आमचे हे दिसत नाही, भाजपात गेले की काय?’ सोशल मीडियावर वायरल
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा भाजप प्रवेश रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

