Share

आम्ही सोबतच, १५ दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय घेणार : देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भरती झाली आहे. या भरतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-सेनेच्या युतीवर भाष्य केले. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसनेची युती अभेद्य राहणार असून, या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येत्या १५ दिवसांच्या काळात जागावाटपाबाबतचा निर्णय घेणार आहोत अस फडणविस यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘काही भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात, अशी जागांची अदलाबदल करण्याचा निर्णयही १५ दिवसांत घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितले.

दरम्यान, गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खा. रणजितसिंह निंबाळकर, मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी होती.

महत्वाच्या बातम्या 

‘शिवसेनच्या अंतर्गतवादावर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तोडगा काढतील’

राष्ट्रवादीला अजून एक धक्का; ‘हा’ माजी खासदारही भाजपच्या वाटेवर?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!