टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं असून, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना अपयश आले आहे.अनेक दिवसापासून सुरु झालेल्या बहुमत चाचणीवर अनेक वादानंतर आज (मंगळवारी) मतदान झाले. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावात सरकारचा 99 विरुद्ध 105 मतांनी पराभव झाला.
दरम्यान, राज्यपाल वजुभाई वाला यांनी एच. डी. कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांनी नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्याची विनंती कुमारस्वामींना केली. त्यामुळे भाजप सरकार स्थापन होईपर्यंत कुमारस्वामी काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. पण, त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.


