🕒 1 min read
मुंबई : अमरावतीतील अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी पन्नास खोके एकदम ओके चे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिवसैनीक लाला चौकात गोळा झाले होते. सहा वाजताच्या दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओके, असे नारे देत त्यांच्या गाडीवर हाता- बुक्यांनी मारत नारेबाजी केली. दरम्यान या प्रकरणावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी उदय सामंत यांच्यावर देखील हल्ला झाला होता. शिवसेना विरुद्ध शिंदे गट ही रस्त्यावरील अजून किती काळ चालणार, या प्रश्नावर बांगर म्हणाले, “आम्ही शिंदे गट नाही तर शिवसेना आहोत. हल्ला करणारे लेचे-चपाटे शिवसैनिक होऊ शकत नाहीत. १० लोक, ५ लोक फुटतील पण ५० लोक फुटले, त्यामुळे याच आत्मपरिक्षण त्यांना करावे लागेल. खासदार गेले, स्थानिक प्रतिनिधी गेले. मग खरी शिवसेना कोणती? आमची खरी शिवसेना आहे. ज्या बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेब म्हणाले होतो, जर मला राष्ट्रवादी,कॉंग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेल. आम्हाला कोणी आरे-कारे केले तर बाळासाहेबांचे वाक्य त्यांच्या कानाखाली आवाज काढून सांगू”
संतोष बांगर म्हणाले की, “माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. यावेळी पन्नास खोके एकदम ओके नारे देत काही कार्यकर्ते गाडीसमोर आले आणि त्यांनी नारेबाजी केली. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवलं असतं की संतोष बांगर काय आहे. माझ्यासोबत पत्नी आणि बहिण असल्याने मला गाडीच्या खाली उतरता आलं नाही. नाहीतरी त्यांना पळता भुई कमी पडली असती. शिवसेनेच्या स्टाइलने त्यांना खेदू-खेदू मारलं असतं.”
नेमकं झालं काय ?
शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहनांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain Update | यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, हवामान खात्याचा अंदाज
- Tanaji Sawant | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांनी केलं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही”
- Bindass Kavya | फॉलोअर्स वाढवण्यासाठी बिंदास काव्या झाली होती गायब ; पालकांनी मिळून केला चित्रपटाला लाजवेल असा ड्रामा
- Uday Samant | संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
