Share

Breaking News : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत नामांतरणाबाबत मोठा निर्णय घेतला होता. औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला होता. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले होते. मात्र आता या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.

यामध्ये राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत ही स्थगिती दिली गेली आहे. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविरोधात आक्षेप घेतला होता. हे तिन्ही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यपालांनी गुरुवारी ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले असताना महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घेतले होते. ठाकरे सरकार कोसळण्याआधी २९ जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नामांतरणाचे निर्णय घेण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!