🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : पटियाला कोर्टाने पंजाबी गायक दलेर मेहंदीला गुरुवारी शिक्षा सुनावली आहे. 2003 मध्ये दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमसेर सिंह यांच्यावर मानवी तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र, या निर्णयाला त्यांनी पटियाला न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर गुरुवारी सत्र न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवत दलेर मेहंदीला अटक करून कारागृहात रवानगी केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पंजाबी गायक दलेर मेहंदी हा शोसाठी परदेशात गेल्यावर बेकायदेशीरपणे 10 लोकांना अमेरिकेत घेऊन गेल्याचा आरोप आहे. यानंतर 19 सप्टेंबर 2003 रोजी दलेरचा भाऊ समशेर याच्याविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या कटात दलेर मेहंदीचाही सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले. दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमसेर सिंग या दोघांविरुद्ध अमेरिकेत 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांवर आरोप आहे की त्यांनी लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवून त्याच्याबद्ल्यात मोठी रक्कम घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयाने 2018 दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र त्याचवेळी त्याला जामीन मिळाला होता.
दरम्यान दलेरच्या वकिलाने या निर्णयाला पटियाला कोर्टात आव्हान दिले, मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. ग्रेवाल यांनी आज दिलेल्या निकालानुसार दलेरला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बुलबुल मेहता यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून शमशेर सिंग आणि ध्यानसिंग यांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ashok Chavan | पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत करा – अशोक चव्हाण
- Maharashtra Cabinet : शिंदे, फडणवीसांची सावध भूमिका, 19 तारखेला दोन्ही बाजूचे प्रत्येकी 4 मंत्रीच शपथ घेणार?
- Sanjay Raut | शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे – संजय राऊत
- Uddhav Thackeray : लढाईला तयार राहा, शिवसेना मजबूत हे दाखवून द्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
- Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
