नवी मुंबई : मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदे यांनी कामाचा धडाका लावला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले. ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला खिंडार पडणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून हे ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आज रात्री हि भेट होण्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
दरम्यान, राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिंदे गटात अनेक आमदार सामील झाले आहेत. तसेच १८ पैकी जवळपास १२ खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र दिवसेंदीवस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

