उस्मानाबाद : ड्रोन शेतीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. आत शिवारात ड्रोन दिसणार आहेत. ड्रोनचा वापर शेतीमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीसह इतर कामासाठीही उपयोग केला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्राने निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे.
उस्माबाद जिल्ह्यासाठी 50 लाखांची तरतूद –
उस्मानाबाद जिल्हा परिषदेने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतात कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. केंद्राने घेतलेल्या निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर, ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना शेतकऱ्यांना फक्त मंजूर कीटकनाशकांचाच वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची प्रमाणदेखील निश्चित केले जाणार आहे. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने हवेतून फवारणी करण्याआधी संबंधित ऑपरेटरला 24 तास आगोदर शेतकऱ्यांनी तेथील स्थानिकांना याची माहिती द्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –


