Share

Shinde Government : हे सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरतय का? २४ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

Published On: 

मुंबई : राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार काही दिवसांतच कोसळले. उध्दव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळून सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लगेचच हे सरकार सर्वसामान्य जनतेचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगितले होते. कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही असेही ते म्हणाले होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, असा संकल्प केल्यानंतरही शिंदे सरकारच्या 24 दिवसांच्या काळातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये राज्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही २४ दिवस उलटले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याला अजूनही कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर करूनही राज्याला २४ दिवसांत कृषिमंत्री मिळालेले नाही.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर इतर कोणत्याही प्रकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हे दोघेच सरकार चालवत आहेत, असा आरोपही विरोधकांकडून झाला आहे. शिंदे सरकारच्या काळात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या केल्याचं वृत दिव्य मराठीने दिले आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच निर्णय घ्यायला सुरुवात केली. मागील सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार धक्केही दिले. मात्र शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा सर्वांनाच भयभीत करणार आहे. राज्यात सर्वत्र पाऊस पडत असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी संकटे निर्माण होत आहेत. मात्र राज्याचे कृषी खाते अजूनही वाऱ्यावर असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले. मात्र या योजना फक्त मंत्रालयाच्या फाईल मध्ये असलेल्या आहेत. मागील १ जानेवारी ते जून या ६ महिन्याच्या काळामध्ये मराठवाड्यात ३०६ आणि विदर्भामध्ये ३६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही या संकल्पाचा विचार केला तर, मागील सरकारमध्येही शिंदे यांचा समावेश होता. तसेच याच शिंदे गटातील दादा कृषी हे मागील सरकारमध्ये कृषी मंत्री होते.

या राजकीय कुरघोडीमध्ये मात्र शेतकरी भरडला जातोय हे नक्की आहे. मागील २३ दिवसांमध्ये सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद जिल्ह्यात केल्या आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये १३ आणि यवतमाळमध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. परभणी ६, जळगाव ६, जालना ५, बुलडाणा ५, उस्मानाबाद ५, अमरावती ४, वाशिम ४, अकोला ३, नांदेड २ आणि भंडारा-चंद्रपूरमध्ये २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!