🕒 1 min read
नवी मुंबई : भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ओबीसी आरक्षण, भोंगे प्रकरण, आरे कारशेड, हिंदुत्व आणि अशा अनेक मुद्द्यांवर आज फडणवीस बोलले. महाराष्ट्रातील (महाराष्ट्र) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी (इतर मागासवर्ग) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण झाल्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यास सांगितले. यावरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असतानाच फडणवीसांनी आजही या मुद्द्यावर भाष्य केलं.
भाजपचे सरकार आल्यावर आम्ही ४ महिन्यांत ओबीसी आरक्षण देऊ असे, असे भाजपचे नेते म्हणाले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर केवळ २० दिवसात ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाली. याच संदर्भात फडणवीस म्हणाले कि, “जे काम कुणीही सहज करू शकतो, ते महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष का जमले नाही?, कारण त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती. केवळ राजकारण करण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. ओबीसी आरक्षण त्यांना द्यायचेच नव्हते”.
दरम्यान यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणावरही वक्तव्य केलं. “मराठा आरक्षणाची लढाई सुद्धा आपण लढू. थोडा दीर्घ लढा आहे. पण तोवर आपल्या काळात सुरू झालेल्या ज्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या, त्या पुन्हा सुरू करून त्याला अधिकाधिक निधी देण्याचे काम केले जाईल”, असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs WI : निकोलस पुरनचा ‘रॉकेट थ्रो’ अन् शुबमन गिल झाला आऊट, पाहा ‘हा’ VIDEO!
- Dilip Walse Patil | “एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर…” ; माजी गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती
- Chandrakant patil | “मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”; चंद्रकांत पाटलांची कबुली
- Sharad Pawar on Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
