Share

Sharad Pawar | बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही – शरद पवार

Published On: 

पुणे : स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वाद पुन्हा उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज केलेल्या वक्तव्याचं. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. माझ्यामते बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही. काही घटकांनी शिवछत्रपती यांचे चरित्र लिहिताना धर्मांधता वाढेल, अशाच पद्धतीने चरित्र लिहलं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. “शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. रामदासांचे, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय आहे? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त माँ जिजाऊ होत्या. त्याच शिवाजी महाराज यांच्या गुरू, मार्गदर्शक होत्या. मात्र खऱ्या गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

पुढे ते असेही म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली. हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केले. मात्र त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता, कुलभूषण किंवा कुळवाडी, असा केला.”

दरम्यान या सोहळ्याचे अध्यक्षपद छत्रपती शाहू महाराज यांनी भूषविले. तसेच या सोहळ्याला ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, राजकुमार घोगरे, चंद्रशेखर शिखरे यांसह इतर मान्यवरही उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!